नवी दिल्ली
जागतिक स्तरावर मायक्रोप्रोसेसरच्या पुरवठय़ात कमतरतेमुळे चालू आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीत महिंद्रा आणि महिंद्राने आपल्या उत्पादन व विक्रीत घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कंपनी आपल्या वाहनांच्या उत्पादनासाठीच्या भागांच्या पुरवठय़ासंदर्भात बॉश कंपनीशी संपर्कात असल्याचे समजते. कंपनीच्या ऑटोमोटीव्ह विभागाच्या कामावर अपुऱया पुरवठय़ामुळे परिणाम होतो आहे. निर्मिती आणि विक्री या दोन्हींवर चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत घटीचा परिणाम दिसणार असल्याचा अंदाज महिंद्रा कंपनीने वर्तवला आहे.