नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने डिसेंबरमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल गटातील कार खरेदीदारांना सवलत देण्याचे जाहीर केले आहे. कंपनी सदरच्या वाहन खरेदी वरती 80000 पर्यंतची सवलत देणार असल्याचे सांगितले जात आहे. महिंद्रा एक्सयुव्ही 700 व महिंद्रा थार या कार खरेदीवर मात्र सवलत दिली जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मागच्या महिन्याप्रमाणेच कंपनीने या महिन्यातही सवलतीची योजना राबवली आहे.