मुंबई
शेतकऱयांनी यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार हा अंदाज मनावर घेत ट्रक्टरची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली असल्याचे समजते. महिंद्रा आणि महिंद्राच्या टॅक्टर खरेदीत मेमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. मागच्या मे महिन्यात मागच्या वर्षाच्या मेच्या तुलनेत विक्री 2 टक्के वाढली आहे. मे 2020 मध्ये 24 हजार 017 ट्रक्टर्सची विक्री महिंद्रा आणि महिंद्राने केली आहे.
तर हीच विक्री मे 2019 मध्ये 23 हजार 539 इतकी होती. स्थानिक बाजारातील विक्री आणि निर्यातीची वरील आकडेवारी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेमधील विक्रीची कामगिरी तशी समाधानाचीच म्हणता येणार आहे. मेमध्ये कंपनीने 324 ट्रक्टर्सची निर्यात केली आहे तर मागच्या वर्षी या महिन्यात 1 हजार 165 ट्रक्टर्सची निर्यात झाली होती.