केवळ विदेशातून मागवतो पाणी
सोशल स्टेट्स दर्शविणाऱया लोकांच्या स्वतःच्या अशा पद्धती असतात. आपण एक महिन्यात सुमारे दीड लाख रुपयांच पाणी पित असल्याचा दावा एका व्यक्तीने सोशल मडियावर केला आहे. त्याच्यासाठी या पाण्याच्या बाटल्या विदेशातून येत असल्याचे टिकटॉकवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत म्हटले गेले आहे.
या व्यक्तीचे नाव रेयान डब्स असून त्याने टिकटॉकवर ‘पाण्याच्या छंदा’वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. पाण्याकरता मला सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च येतो. या बाटल्या थेट माझ्या घरी येतात, हे अत्यंत चैनीची वस्तू आहे. एवढय़ा सर्व बाटल्या ठेवण्यासाठी घरात मी चार फ्रिज बाळगल्याचे त्याने म्हटले आहे.
नॉर्वेतून येते पाणी
रेयान हे पाणी नॉर्वेमधून मागवतो. हे व्हीओएसएस कंपनीच पाणी असून त्याच्या पसंतीचा पाण्याच्या बाटल्यांचा ब्रँड आहे. पाण्याला रेयान एक सोशल स्टेट्सप्रमाणे मानत आहे. तो पाण्याची घाऊक ऑर्डर देतो. प्रत्येकाची स्वतःची अशी पसंत असते असे तो म्हणतो.
अमेझॉनच्या ब्रिटिश संकेतस्थळावर व्हीओएसएसच्या 12 लिटरच्या पाण्याच्या पॅकेजची किंमत सुमारे 2700 रुपये आहे. परंतु ही कंपनी अनेक प्रकारच्या पाण्याचा पुरवठा करते, ज्याच्या किमती वेगवेगळय़ा असतात. रेयानच्या या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या टिप्पणी येत आहेत. काही जणांकडून त्याचे कौतुक करत आहेत. तर काही जण टीका करत आहेत.