वृत्त संस्था/ नवी दिल्ली
महिलांच्या चँलेजर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला 4 डिसेंबरपासून विजयवाडा येथे प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण चार संघांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रातील अनेक आघाडीच्या क्रिकेटपटूंना विश्रांती देण्यात आली आहे. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना सहभागी होणार नाहीत.
चार संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा 9 डिसेंबरला संपणार आहे. इंडिया अ संघाचे नेतृत्व स्नेह राणा, इंडिया ब संघाचे नेतृत्व तानिया भाटिया, इंडिया क संघाचे नेतृव शिखा पांडे तर इंडिया ड संघाचे नेतृत्व पूजा वस्त्रकारकडे सोपविण्यात आले आहे. इंडिया क आणि इंडिया ड यांच्यात या स्पर्धेतील पहिला सामना 4 डिसेंबरला खेळविला जाणार आहे.