वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी समस्येमुळे भारतात होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेतून हॉलंडच्या महिला संघाने माघार घेतली आहे. यजमान भारत आणि हॉलंड यांच्यातील हे सामने भुवनेश्वरमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी खेळविले जाणार होते.
हॉलंडमध्ये अलीकडच्या चार दिवसांच्या कालावधीत ओमिक्रॉन-कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने हॉलंडच्या हॉकी संघटनेने भारतात होणाऱया या स्पर्धेतील सामने लांबणीवर टाकण्याची विनंती आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला केली होती. हॉलंडच्या आरोग्य खात्यातर्फे महिला हॉकी संघाला भारताचा दौरा न करण्याचा सल्ला देण्यात आल्याने आता या स्पर्धेत हॉलंडचा महिला संघ सहभागी होणार नाही. हॉलंडच्या हॉकी संघटनेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाबाबत हॉकी इंडियाने आश्चर्य व्यक्त केले आहे. भारतामध्ये कोरोना गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत नियंत्रणाखाली आल्याचे सांगण्यात आले. सध्या देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 टक्क्मयांपेक्षा कमी असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी भुवनेश्वरमध्येच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची पुरुषांची कनि÷ विश्वचषक हॉकी स्पर्धा यशस्वीपणे भरविण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये 16 संघांनी आपला सहभाग दर्शविला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शवित आहे. या स्पर्धेतील मस्कतमध्ये झालेल्या पाठोपाठच्या दोन सामन्यात भारतीय संघाने चीनचा अनुक्रमे 7-1 आणि 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. या स्पर्धेत हॉलंडच्या महिला संघाने आतापर्यंत तीन सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत सोडविला आहे.