रायबाग येथे कर्नाटक विकास ग्रामीण बँकेच्यावतीने बचत गट मेळावा उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
गरीब महिलांच्या सबलीकरणासाठी आजही स्व-साहाय्य बचत गटांची भूमिका महत्त्वाची ठरते, असे कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचे महाप्रबंधक चंद्रशेखर डी. मोरो यांनी सांगितले. रायबाग तालुक्मयातील संसुद्धी येथे बँक व आयडीएफ संस्थेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्व-साहाय्य बचत गटाच्या सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
चंद्रशेखर मोरो पुढे म्हणाले, खास करून ग्रामीण भागातील महिला गरिबीतून बाहेर पडण्यासाठी समान विचारधारा असणाऱयांचा एक गट स्थापन करून त्याद्वारे प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन कृषी व इतर रचनात्मक उद्योग साकारावेत. महिलांमध्ये उद्यमशीलता व बचतीची मानसिकता जन्मतःच असते. या भावनेला वाव देऊन त्याद्वारे विकास साधणे सहजशक्मय आहे.
महिलांच्या विकासासाठी आपली बँक कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा, जीवनसुरक्षा विमा आदी योजनांबरोबरच साठ वर्षांनंतर पेन्शन मिळवून देण्यासाठी अटल पेन्शन योजनेतही महिलांनी भाग घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांशी व आयडीएफ प्रतिनिधींशी संवाद साधला.
आयडीएफचे अधिकारी धर्मदर्शी सालीमठ म्हणाले, आयडीएफ ही संस्था स्व-साहाय्य संघ हाताळण्यात नावाजलेली आहे. स्व-साहाय्य संघांच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. कर्नाटक विकास ग्रामीण बँक दुर्गम खेडय़ापाडय़ातही अस्तित्वात आहे. या विकास प्रक्रियेत त्यांची चांगली साथ मिळते. यावेळी बँकेचे चिकोडी येथील प्रादेशिक व्यवस्थापक रमानंद नायक यांनी प्रास्ताविक केले. आयडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. आर. हिरेमठ, कर्जवितरण विभागाचे मुख्य प्रबंधक व्ही. व्ही. याजी आदी उपस्थित होते.