100 लेखिका आणि फिक्शन रायटर्सना तंत्रज्ञानाचे धड
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी (एनएफडीसी) करार केला आहे. याच्या अंतर्गत देशात 100 चित्रपटलेखिका आणि फिक्शन रायटर्सना चित्रपटलेखनाचे तंत्रज्ञान शिकविण्यात येणार आहे.
कंपनी सध्या 10 दिग्दर्शिकांसोबत काम करत आहे. आम्ही चित्रपटसृष्टीत महिलांचे योगदान वाढवू इच्छितो असे उद्गार नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांनी काढले आहेत.
आगामी काळात बॉम्बे बेगम, पगलैट आणि माधुरी दीक्षितच्या चित्रपटांची सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असून हे सर्व महिलाकेंद्रीत चित्रपट असून लेखिकांनी लिहिलेल्या पटकथा आहेत.
नेटफ्लिक्स महिलांच्या गुणवत्तेला व्यासपीठ देण्यासाठी जगभरात 50 लाख डॉलर्स खर्च करणार आहे. हा खर्च नेटफ्लिक्ससाठी चित्रपटांवर काम करणाऱया केवळ निर्मात्या किंवा लेखिकांवरच नव्हे तर चित्रपटसृष्टीसाठी काम करणाऱया सर्व महिलांवर होणार आहे.