महिला संघटनेतर्फे जीएसएस महाविद्यालयात प्रा. संध्या शेरेगार यांचे व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
महिला संघटनेतर्फे एसकेई सोसायटीच्या जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयात प्रा. संध्या शेरेगार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर प्राचार्य प्रणव पित्रे, प्रा. अनिल खांडेकर, प्रा. सविता कुलकर्णी, बिंबा नाडकर्णी उपस्थित होत्या.
उपस्थितांचे स्वागत महिला संघटनेच्या अध्यक्षा प्रा. सविता कुलकर्णी यांनी केले. बिंबा नाडकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बिंबा नाडकर्णी यांचे स्वागत प्रा. सविता कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शुभदा मनगोळी यांनी करून
दिला.
यावेळी प्रा. डॉ. संध्या शेरेगार यांनी आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा. आपल्या आयुष्यात अनेक दुःखाचे प्रसंग येतात. पण आपण त्याला आत्मविश्वासाने पुढे जात राहणे गरजेचे आहे. आपल्या जीवनाच्या प्रवासात पुढे जात असताना अनेक कष्ट व समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शांत राहणे हाच एक रामबाण उपाय आहे, असे मत व्यक्त केले. प्राचार्य प्रणव पित्रे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्रा. वैशाली, भारती आणि प्रा. अनुजा चव्हाण यांचा त्यांच्या शैक्षणिक योगदानासाठी व त्यात यशस्वी कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन ऐश्वर्या बिलगीकर हिने केले. प्रा. दीपाली भांदुर्गे यांनी आभार मानले.