प्रतिनिधी /बेळगाव
महिला आघाडी कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी सोमवार दि. 17 रोजी किर्लोस्कर रोड येथील हुतात्मा चौकात सकाळी 9 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी सर्वांनी उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करावे, असे सांगितले.