प्रतिनिधी /बेळगाव
सालाबादप्रमाणे यंदाही महिला आघाडीतर्फे नागपंचमीसाठी काकतीवेस येथील महिला आघाडीच्या हॉटेलसमोर स्टॉल उभारण्यात आला आहे. बुधवारी सकाळी या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्टॉलवर पोहेलाडू, रवालाडू, बेसनलाडू, तंबीट व पाव किलो चिवडा व लाहय़ा यांचा संच माफक दरात देण्यात येत आहे. गरजू स्थानिक उद्योजक महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, राजश्री बाबुळकर, शालिनी पाटील, आशा पाटील, श्रद्धा मंडोळकर, भाग्यश्री जाधव, माला जाधव, साक्षी किल्लेकर, राजश्री बडमंजी, प्रभा कुरणे, शाकिरा गोकाक व अन्य महिला उपस्थित होत्या.