प्रतिनिधी / बेळगाव
महिला आघाडीच्यावतीने तिळगुळ समारंभानिमित्त केकवर आयसिंग करणे व सुहाना पनीर बटर मसाला वापरून पाककृती करणे या स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे-
आयसिंग 1) अर्चना राजगोळकर, 2) वर्षा मेलगे, 3) श्रद्धा देसाई, उत्तेजनार्थ रूपाली चव्हाण, रूपा पाटील, श्वेता फडके.
सुहाना- 1) स्नेहल श्रीहर्षा, 2) आकांक्षा देसाई, 3) राजश्री बांबूळकर.
मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत सविता पाटील विजेत्या ठरल्या. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर व अन्य पदाधिकाऱयांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.