प्रतिनिधी /बेळगाव
गणपत गल्ली येथील महिला आघाडी को-ऑप. सोसायटी लि.ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी सोसायटीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर होत्या. त्यांनी प्रास्ताविक करून सभासद, भागधारक, संचालक व कर्मचाऱयांचे स्वागत केले. सचिव कांचन यळ्ळूरकर यांनी 2020-21 सालच्या अहवालाचे वाचन केले. भागधारक चंद्रकांत कदम यांनी व्याजदरात 1 टक्का कपात करण्याचा ठराव मांडला. त्याला प्रमोद कोळेकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर कांचन यळ्ळूरकर यांनी आभार मानले.
या सभेला प्रिया कुडची, मंजुश्री कोळेकर, अर्चना कावळे, अर्चना देसाई, आशा सुपली, कांचन भातकांडे, रेखा गोजगेकर, प्रभावती सांबरेकर, भाग्यश्री जाधव, सुजाता बामुचे, दीपा मुतगेकर, श्रद्धा मंडोळकर, शाकिरा गोकाक, राजश्री बाबुळकर, शामिनी पाटील, भरत व सुहास किल्लेकर उपस्थित होते.