प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात महिलांवरील गुन्हे खपवून घेतले जाणार नसल्याचे प्रतिपादन करून महिला व बालकांवरील गुह्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबात आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे थांबविण्यासाठी अधिक स्वयंप्रेरित पावले सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले.
रायबंदर येथे सायबर गुन्हे प्रतिबंधक (सीसीपीडब्ल्यूसी) योजनेंतर्गत सायबर फॉरेन्सिक तथा प्रशिक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. डॉ. सावंत यांनी सरकारने राज्यात आयपीसीमध्ये बदल करण्यासाठी काम सुरू केले आहे अशी माहिती दिली आणि ते निश्चितपणे कमी कालावधीत पूर्ण होईल असे ते म्हणाले.
महिला आणि बालकांविरुद्ध सायबर गुन्हे प्रतिबंधक अंतर्गत सायबर फॉरेन्सिक तथा प्रशिक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यास पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिस खात्याचे अभिनंदन केले. या उपक्रमामुळे राज्यातील महिला व बालकांवरील गुन्हे रोखण्यास निश्चितच मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
गोवा राज्यात सायबर गुह्यांचा शोध घेण्याचे प्रमाण गेल्या वषी अंदाजे 93ज्ञ् होते जे देशात सर्वाधिक होते. सायबर गुह्यांच्या नोंदणीबाबत बोलताना यावषी सायबर गुन्ह्याखाली एकूण 16 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 10 गुन्हे उघडकीस आले आहेत तर 6 गुह्यांचा तपास सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
सर्व मुले मोबाईलचा वापर शिक्षणासाठी, नाविन्यपूर्ण हेतूसाठी करत आहेत. गुन्हेगारही याच गोष्टींचा वापर करून गुन्हे करतात. आता आपण पाहतो की असे गुन्हे प्रामुख्याने ऑनलाइन स्वरूपाचे आहेत. डॉ. सावंत यांनी तुमची वैयक्तिक माहिती कुणालाही सांगू नका असे आवाहन केले आहे. त्यांनी सर्व गोमंतकीयांना कोणत्याही सायबर गुन्ह्याशी संबंधित गुन्हा नोंदविण्याचे आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱया सायबर गुह्यांबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला.
सायबर गुन्हा कक्षाच्या कार्यावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्र्यांनी आम्ही सर्व पोलिसांना सायबर गुह्यांमध्ये अपग्रेड करू असे सांगितले. विविध सायबर गुन्हे घडत आहेत. समाजात होत असलेल्या सायबर गुह्यांबाबत नावीन्य आणि गुन्हे समजून घेण्यावर सायबर कक्ष काम करील असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी 19 डिसेंबर 2021 पर्यंत पोलीस खात्यात विविध नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा आमचा विचार असल्याची माहिती दिली आणि गोव्यातील प्रकरणे शोधण्यासाठी पोलीस खाते सतत कार्यरत आहे. सरकारने सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार आणि आयटीजीचे अध्यक्ष श्री. निळकंठ हलर्णकर, डीजीपी गोवा डॉ. इंद्रदेव शुक्ला, आयटीजीचे संचालक श्री विवेक एचपी, आयजीपी श्री राजेश कुमार, सीसीपीचे महापौर रोहित मोन्स?रात आणि आयजीपी श्री. परमादित्य उपस्थित होते. मुख्य पाहुण्यांच्या आगमनानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. श्रीमती लॉरीन सिक्वेरा यांनी सूत्रसंचालन केले.