‘सेक्स स्कँडल’च्या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त करण्यासाठी पाऊल, राज्यातील महिला असुरक्षित : बीना नाईक
प्रतिनिधी /मडगाव
शुक्रवारी उघड झालेल्या सेक्स स्कँडलच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या विविध गटांकडून निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढून जनजागृती करण्यात आली. गोव्यातील मुली आणि स्त्रिया विकृत मानसिकतेपासून सुरक्षित नाहीत म्हणून महिला काँग्रेसने मडगाव, सांखळी, वाळपई, काणकोण, केपे, वेळ्ळी आणि फोंडा येथे मूक मेणबत्ती मोर्चा काढल्याची माहिती महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक यांनी दिली. मडगाव पालिका चौकात काढलेल्या मोर्चावेळी पत्रकारांशी बोलताना अध्यक्षा नाईक यांनी वरील माहिती दिली.
महिलांवरील अत्याचार गोव्यात वाढले आहेत. महिला असुरक्षित होऊ लागल्या आहेत. सरकारातील मंत्रीच महिलेवर अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे. कायदे तयार करणारेच कायदे पायदळी तुडवत असल्याने या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसून यापुढेही राहणार नाहीत. काँग्रेस सरकारच महिलांना सुरक्षितता देऊ शकते, असा दावा अध्यक्षा नाईक यांनी यावेळी केला.
मागील वर्षाचा अहवाल पाहिल्यास देशाच्या तुलनेत गोव्यातील गुन्हय़ांची टक्केवारी जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. हे गोव्यासाठी घातक आहे. बलात्कार, विनयभंग, अपहरण, खून यासारखे महिलांविरूद्धचे गुन्हे नित्याचेच बनले आहेत. यंदाच्या वषी त्यात सुधारणा झालेली नसून गुन्हे वाढत चालले आहेत. अपहरणाच्या गुन्हय़ांचा आकडा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे, असा दावा नाईक यांनी केला.
गोव्यासारख्या लहान प्रदेशात गुन्हय़ांचे प्रमाण आटोक्मयात ठेवणे शक्मय आहे. त्यासाठी सक्षम पोलीस यंत्रणा, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची गरज असून काँग्रेस सरकारच महिलांना सुरक्षितता मिळवून देऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला कौल देण्याचे आवाहन महिला काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षा कार्मेलिना वाझ यांनी केले. राज्यातील महिलांवरील गुन्हे वाढत असल्याने महिला वर्गात दहशत पसरली असून त्या घराबाहेर पडण्यास घाबरू लागल्या आहेत. सरकारातील मंत्रीच महिलांवर अत्याचार करत असल्याने या सरकारकडून महिला सुरक्षेच्या बाबतीत काय म्हणून अपेक्षा ठेवणार, अशी प्रतिक्रिया मडगाव महिला काँग्रेस गटाध्यक्षा प्रतिमा बांदेकर यांनी व्यक्त केली.