क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
जितो लेडीज विंगतर्फे बिट्स द स्टंप्स महिलांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जैन पँथर्स संघाने विजेतेपद तर वॉरियर संघाने उपविजेतेपद पटकाविले.
शिवगंगा रोलर स्केटींग रिंकवर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भारती हरदी, रजत हरदी, पुष्पक हणमण्णावर, मोघ निलजंगी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 8 महिला संघांनी भाग घेतला होता. जैन पँथर्स, वॉरियर्स, जैन स्टार, जैन दिवान, टीम इन्फर्नो, चॅम्पियन्स, रॉयल लेडीज, ब्रम्ही चॅलेंजर या संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना जैन पँथर्स व वॉरियर्स यांच्यात झाला. या सामन्यात जैन पॅंथर्स संघाने वॉरियर संघाचा 15 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले.
मयुरा शिवलकर, विक्रम जैन, सुनील कटारिया, अंकिता खोडा आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या जैन पँथर्स, उपविजेत्या वॉरियर्स संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक बक्षिसे मॅन ऑफ द मॅच पद्मश्री सैलण्णावर, मालिकावीर म्हणून शालिनी पोरवाल, उत्कृष्ट फलंदाज सिमरन पोरवाल, उत्कृष्ट गोलंदाज हर्षिता पोरवाल यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा अरूणा शहा, सचिव शिल्पा हजारे, दीपाली पत्रावळी व इतर सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.