प्रतिनिधी/लांजा
पाच दिवसांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावच्या एका तंटामुक्ती अध्यक्षकडून आपल्या दोन उमेदवारांचा पराभव झाल्याचा राग अनावर होऊन वाडीतील विजयी झालेल्या महिला उमेदवाराशी गैर वर्तन केल्याची संतापजनक घटना गावामद्ये घडली. लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील एक प्रसिध्दी गावात ही संतापजनक घटना घडली आहे. याबाबत महिलेने लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. निवडणुकीतील वादातून या घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनने तालुक्यातुन संतापाची लाट पसरली आहे. मात्र पोलिसात तात्पुरती तक्रार दाखल केल्यानंतर दुस्रया दिवशी या प्रकरणावर पोलीस सामंजस्याने पडदा पाडण्यात आला.
निवडून आलेल्या महिलेशी गैर वर्तन करणारा तंटामुक्ती अध्यक्ष हा एका राजकीय पक्षाचे वाडीपुरते पुढारपणाचे काम करतो. आपल्या वॉर्डमध्ये आपल्या पॅनलचा पराभव जिव्हारी लागल्याने विरोधी पक्षाकडून निवडून आलेल्या ग्रामपंचायत महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याची गंभीर घटना घडल्याने तालुक्यातून संतापजनज प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगळवारी रात्री त्या महिला सदस्याने व तिच्या कुटुंबियांनि लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्या महिला सदस्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शिवीगाळ, मारहाणं करून तुम्हाला बघून घेईन अशी धमकी त्या तंटामुक्ती अध्यक्षाने दिली आहे. तंटामुक्ती अध्यक्ष व मारहाण झालेली तक्रारदार महिला सदस्या या एकाच वाडीतील आणि एकमेकांचे शेजारी आहेत. वॉर्ड क्रमांक 2 च्या गाव पॅनल च्या दोन महिला उमेदवार या दोघीही विजयी झाल्या. दोघीनीही विरोधी राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करून विजयी यश मिळवले. त्यामुळे मंगळवारी त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी पेढे घेऊन वाडीमध्ये गेल्या. याचवेळी स्वतःला एका राजकीय पक्षाचा पुढारी म्हणवणारा तंटामुक्ती अध्यक्ष याने दोन्ही महिला उमेदवार यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करत ढकलून दिले. त्याच्यासोबत अजून तीन माणसे त्याने आणली होती. त्या महिला सदस्यांना हाताला पकडून त्यांना फरफटत घरापर्यंत नेले व तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली. याबाबत महिला सदस्यांनी त्याक्षणी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी या गगंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे त्या महिला सदस्यांनी म्हटले आहे. दुस्रया दिवशी म्हणजे बुधवारी त्या तंटामुक्ती अध्यक्षाला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावण्यात आले. त्याला समज देऊन असे प्रकार पुढे होऊ नये याची समज देण्यात आली. मात्र पोलिसांकडून आपल्याला सहकार्य मिळायला हवे तसे मिळाले नसल्याचे त्या तक्रारदार महिला यांनी म्हटले आहे. मात्र या घृणास्पद घटनेचा लांजा तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. तंटामुक्ती अध्यक्षच राजकीय दबाव टाकून गावात तंटे करत असेल तर या तंटामुक्त अध्यक्षच्या पदाबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.