वृत्तसंस्था/ पॅरीस
2020 च्या टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंची पहिली मानांकन यादी सोमवारी घोषित करण्यात आली. नव्या वर्षांच्या या पहिल्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने अग्रस्थान मिळविले आहे.
महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 7851 गुणांसह पहिल्या, झेकची प्लिसकोव्हा 5525 गुणांसह दुसऱया, रूमानियाची हॅलेप 5462 गुणांसह तिसऱया, जपानची ओसाका 5311 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5075 गुणांसह पाचव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 4935 गुणांसह सहाव्या, झेकची क्विटोव्हा 4721 गुणांसह सातव्या, स्वीसची बेनसिक 4685 गुणांसह आठव्या, हॉलंडची बर्टन्स 4245 गुणांसह नवव्या आणि अमेरिकेची सेरेना विलीयम्स 3935 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.