योगगुरु प.पू स्वामी रामदेवजी महाराज यांची विशेष उपस्थिती
सावंतवाडी/प्रतिनिधी-
महिला दिनाच्या निमित्ताने योगगुरु प.पू स्वामी रामदेवजी महाराज यांनी रत्नागिरीमध्ये घेतलेल्या एक दिवसीय योग विंज्ञान शिबिर व महिला कार्यकर्ता महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडला कोरोना काळ नंतर पुन्हा ओपन ग्राऊंड शिबिर सुरू करण्याचा मान रत्नागिरीवासीयांना मिळाला. 2 वर्षांच्या कालावधी नंतर पहिल्यांदाच स्वामीजींनी हरिद्वार सोडून बाहेरच्या राज्यात शिबिर घेतले. त्या प्रसंगी सिंधुदुर्ग युवा जिल्हा प्रभारी(अध्यक्ष) श्री विद्याधर पाटणकर यांना योगगुरू रामदेव बाबांचा विशेष आशीर्वाद प्राप्त झाला. या प्रसंगी सिंधुदुर्ग पतंजली, भारत स्वाभिमान जिल्हा समितीने शिबिरस्थळी रामदेवबाबा यांची भेट घेतली विकास गोवेकर यांनी सुवाच्च अक्षरात लिहिलेले हस्तलिखित महाराजांना गुरुवंदना म्हणून भेट दिले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेश भाट, तुळशीराम रावराणे, रावजी परब आणि इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.