साताऱयातील घटना : चोरटय़ांचे वाढते धाडस ठरतेय डोकेदुखी : पोलिसांनी हटकल्याने चोरटय़ाने काढला पळ
प्रतिनिधी / सातारा
साताऱयातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी ग्रामपंचायत इमारतीजवळून घरी निघालेल्या महिला पोलिसाच्या हातातील मोबाइल व कॅलक्युलेटर हिसकावून चोरटय़ाने पळ काढला. मात्र, त्या ठिकाणावरून पळ काढून निघालेल्या चोरटय़ाला पोलिसांनी ओळखून त्याच्या नावाने हाक मारल्याने त्याने हिसकावून चोरलेले साहित्य टाकून झोपडपट्टीकडे पळ काढल्याने साहित्य परत मिळाले.
परंतू चोरटय़ांचे हे वाढलेले धाडस पोलिसांसह नागरिकांसाठी डोकेदुखी बनताना दिसत आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक सरोजनी अजय शिंदे (रा. देशपांडे मारूती मंदिराजवळ, सातारा) यांनी यल्या अनिल कोळी (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 21 रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील कामकाज संपवून घरी निघाल्या होत्या. त्या शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळ आल्या असताना यल्या कोळीने त्यांच्या हातातील मोबाईल व कॅलक्युलेटर हिसकावून पळ काढला. दरम्यान त्या ठिकाणावरून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार हसन तडवी व पोलीस नाईक माने हे निघाले होते. यावेळी तडवी यांनी पळ काढणाऱया संशयिताला ’यल्या थांब,पळू नको’ असा आवाज दिला. पोलिसांनी आपल्याला ओळखल्याच्या भितीने त्याने शिंदे यांचा मोबाइल व कॅलशी टाकून आकाशवाणी झोपडपट्टीच्या दिशेने पळ काढला.
त्यानंतर शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात यल्या कोळी याच्याविरोधात जबरी चोरीच्या प्रयत्नाची फिर्याद दिली. पुढील तपास हवालदार कुमठेकर करत आहेत.