कतारने मागितली माफी
दोहा : 2 ऑक्टोबर रोजी कतार एअरवेजच्या 10 विमानांनी दोहा येथे पोहोचलेल्या महिला प्रवाशांची निर्वस्त्र झडती घेण्यात आली आहे. या प्रवाशांमध्ये 13 महिला ऑस्ट्रेलियाच्या नागरिक होत्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी याला भयावह आणि असहय़ कृत्य ठरविले आहे. तर कतारने या घटनेसाठी माफी मागितली आहे. 2 दोहा विमानतळाच्या एका कचऱयाच्या पेटीत नवजात बाळ मिळाले होते. एखाद्या प्रवाशाने या मुलीला जन्म दिल्यावर तिला फेकल्याचा संशय सुरक्षा अधिकाऱयांना होता. याच संशयापोटी विमानतळावर येणाऱया प्रत्येक महिलेची निर्वस्त्र झडती घेण्यात आली होती. कुठल्या महिलेने या मुलीला जन्म दिला आहे हे शोधण्याचा यामागील हेतू होता.