कोरोनाच्या अनुषंगाने केल्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्हा अभियान व्यवस्थापनचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी महिला बचत गटांना सक्त ताकीद दिली आहे.तसे पत्र काढले असून जे सूचना पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी म्हणून प्रकल्प संचालक यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही महिला बचत गटांच्या बैठका सामाजिक अंतर पाळले जात नाही.तसेच मास्क आणि सानिटायझरचा वापर केला जात नाही.तरी कोव्हिडं चा प्रसार रोखण्यासाठी उपाय योजना अंमलात आणणे गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गावच्या बचतगटांना सूचित करण्यात येते की बैठकीत उपस्थित राहण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.सामाजिक अंतर पाळावेत.मास्क व सानिटायझरचा वापर करावा, बोलताना तोंडावरील मास्क काढू नये, मास्कला हात लावू नये, प्रशिक्षणात गर्भवती महिला ज्यांना ताप, श्वसनाचा त्रास, दिर्घ कालीन खोकला असणायांनी जाऊ नये, आदी सूचना पाळाव्यात अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.