नीतेश राणेंची माहितीः आत्मनिर्भर सिंधू अभियानांतर्गत भाजपाचा उपक्रमः कणकवली मतदारसंघात होणार वाटप
प्रतिनिधी / देवगड:
महिलांचे आर्थिकदृष्टय़ा सक्षमीकरण व्हावे, यासाठी आमदार नीतेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पाच हजार किलो ‘सेलम’ जातीचे तीनपट उत्पन्न मिळवून देणारे हळदीचे बियाणे आमदार राणे यांच्यामार्फत कणकवली मतदारसंघातील महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. हे सेलम जातीचे हळदीचे बियाणे (वान) आणि लागवडीसंदर्भातील माहिती पत्र मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरम्यान, भाजपच्यावतीने आत्मनिर्भर सिंधू अभियानांतर्गत हा उपक्रम राबविला जात असून त्यासाठी भगिरथ ग्रामविकास प्रति÷ानचे डॉ. प्रसाद देवधर हे तांत्रिक सहयोग देणार आहेत, अशी माहिती आमदार राणे यांनी दिली.
कोकणाचे व भाताचे अतूट नाते आहे. पण, ज्या जमिनीमध्ये भात होत नाही, अशा वरकस जमिनीमध्ये हळदीचे पीक येथील शेतकऱयांना चांगला नफा देऊ शकते. प्रत्येक घरामध्ये घरापुरती हळद पावडर तयार व्हावी. जेणेकरून नेहमीची स्वयंपाकघरातील गरज आपण स्वतःच उत्पादन केलेल्या हळदीने पूर्ण होईल. त्यासाठी सांगलीहून ‘सेलम’ जातीचे बियाणे व लागवडीसंबंधीचे माहितीपत्रक बचतगटांना वितरीत केले जाणार आहे. जेवढय़ा जागेमध्ये आपण भात घेतो, तेवढय़ाच जागेतील हळद तीनपट उत्पन्न देते. त्यामुळे भविष्यामध्ये यातून शेतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे राणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बियाणे भाजप कार्यालयांमध्ये उपलब्ध होणार
गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव विचारात घेता अधिकाधिक हळद लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. आंब्याच्या बागा, काजू लागवड यामध्ये आंतरपीक म्हणून हळद लागवड होऊ शकते. याचा विचार करून आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. एकूण पाच हजार किलो हळदीचे बियाणे भरतीय जनता पार्टीच्या वैभववाडी, देवगड व कणकवली या तालुका कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिला ग्रामसंघ, बचत गट व सरपंचांनी या वितरणामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन राणे यांनी केले आहे.
हळद लागवडीचे ‘तंत्र व मंत्र’ आत्मसात करा
दोन किलो हळद बियाण्यापासून चार किलो हळद पावडर मिळू शकते. बाजारात हळदीची किंमत दोनशे रुपये किलो आहे. 250 कुटुंबे जरी एका गावात गृहीत धरली, तरी एक लाखाची हळद पावडर वर्षासाठी पाच माणसांना लागते. ‘कोरोना’नंतर अशा छोटय़ा वाटणाच्या गोष्टींचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये सांगली जिह्याच्या समृद्धीमध्ये हळदीचे योगदान खूप मोठे आहे. कोकणातील महिला बचत गटांनी या पिकाचा आभ्यास करून हळद लागवडीचे ‘तंत्र व मंत्र’ आत्मसात केल्यास रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.