वृत्तसंस्था / लास वेगास
एमजीएम ग्रँडगार्डन परिसरात प्रसिद्ध असलेल्या मुष्टियुद्ध लढतीच्या शोमधील आघाडीची महिला बॉक्सर अमेरिकेची मिकेला मेयरला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. कनि÷ लाईटवेट गटात खेळणाऱया मिकेला मेयर हिची प्रकृती नादुरुस्त झाल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीत तिला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
रविवारी मेयरने स्वतः होऊन सोशल मिडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. लास वेगास येथील एमजीएम ग्रँडगार्डन येथे अमेरिकेची मिकेला मेयर हिची लढत हेलन जोसेफबरोबर मंगळवारी आयोजित केली होती. या लढतीपूर्वीच मेयरने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितल्याने आता ही लढत रद्द करण्यात आली आहे. मिकेला मेयरने कनि÷ लाईटवेट गटात आतापर्यंत 12 लढती जिंकल्या आहेत.