प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी महात्मा गांधी महर्षि रोडवरील सिद्धिविनायक मंदिरामध्ये दसऱयाच्या मुहूर्तावर सिद्धी महिला मंडळ सरकार नोंदणीकृत मान्यताप्राप्त कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अंजली चिकोडी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दुर्गादेवीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
मंडळाच्या सचिव नीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. सिद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता सुभेदार यांनी डॉ. चिकोडी यांचा परिचय करून दिला. देवस्थानचे पुरोहित देशपांडे गुरुजी यांनी त्यांचा सत्कार केला.
प्रास्ताविक करताना नीता पाटील म्हणाल्या, डॉ. अंजली चिकोडी यांनी कोरोनाकाळात रुग्णांची सेवा केली. त्या कोरोना योद्धय़ा असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे. सिद्धिविनायक देवस्थान व महिला मंडळ 27 वर्षांपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. मंडळ नेंदणीकृत झाले असून यापुढेही उपक्रम सुरूच राहतील. डॉ. चिकोडी यांच्या हस्ते सर्व संचालकांचा व पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. चिकोडी म्हणाल्या, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे. मला अनेक डॉक्टर व स्टाफचे सहकार्य लाभले आहे. महिला मंडळ हे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. त्याचा महिलांनी उपयोग करून घ्यावा.
याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण गिंडे, सचिव माजी नगरसेवक पंढरी परब, संचालक वैजनाथ गिलबिले, अशोक ढेगसकर, जोतिबा गिलबिले, अमित कारेकर, दिनेश तवनोजीचे, पंच शिवाजी जाधव, बसवंत पाटील, विजय भातकांडे, उपाध्यक्षा स्नेहा गिंडे, अश्विनी गोडसे, दीपा रूटकुटे, रेश्मा फाटक, वर्षा गिलबिले, निता पाटील, रितू जाधव, स्वाती जाधव, दिप्ती गिलबिले आदी उपस्थित होत्या.