हुबळी/ प्रतिनिधी
हुबळी शहरातील बालाजी रूग्णालयात एका महिला रूग्णावर अत्याचार केल्याप्रकरणी सदर रूग्णालयात काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयला विद्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. अशोक हलगी (रा. अंनिगेरी) असे त्या अटक करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. या घटनेनंतर तो फरारी झाला होता. दरम्यान अपघात झाल्याने तो जखमी झाला. यावेळी त्याला अटक करण्यात आली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
अर्धांगवायू तसेच पुप्फुसाच्या संसर्गामुळे एका महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिला सिटी स्कॅन करण्यासाठी कक्षात नेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंबंधी२३ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.