वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020-21 सालातील होणाऱया हिरो पुरस्कृत भारतीय महिला लीग फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद ओडिशा भूषविणार असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने रविवारी दिली.
या स्पर्धेच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत पण लवकरच या स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केले जाईल. या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची ओडिशा शासनाने तयारी दर्शविली असल्याबद्दल फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ओडिशा शासनाचे आभार मानले आहे.
2022 सालातील होणाऱया एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे. तसेच फिफाची 17 वर्षांखालील वयोगटाची 2022 सालातील महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे.