वृत्तसंस्था/ डब्लिन
दक्षिण आफ्रिकेत होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी क्रिकेट आयर्लंडने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून जानेवारीअखेरीस हा संघ रवाना होणार आहे. या संघाचे नेतृत्व लॉरा डेलॅनीकडे सोपविण्यात आले आहे.
आयर्लंड महिला संघाचे या स्पर्धेत पुनरागमन झाले असून यापूर्वी 2018 महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी भाग घेतला होता. यावर्षीची वर्ल्ड कप स्पर्धा 10 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून आयर्लंडचा पहिलाच सामना बलाढय़ इंग्लंडविरुद्ध 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
आयर्लंड महिला संघ ः लॉरा डेलॅनी (कर्णधार), जॉर्जिना डेम्पसे, अँडी हंटर, शॉना कॅवानाह, अर्लीन केली, गॅबी लेविस, लुईस लिटल, सोफी मॅकमोहन, जेन मॅग्वायर, कारा मरे, लीय पॉल, ओर्ला प्रेन्डरगास्ट, इमीयर रिचर्डसन, रेबेका स्टोकेल, मेरी वाल्ड्रन.