स्पर्धेत 6 शाळांनी घेतला सहभाग
प्रतिनिधी / बेळगाव
येथील महिला विद्यालय मंडळ इंग्रजी माध्यम शाळेतर्फे इनफिनिटी 2के21 या आंतरशालेय फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा इ. 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजिली होती. सदर स्पर्धेत 6 शाळांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले.
स्पेल बी स्पर्धेत इ. 9 वी मधून सुकन्या कुंदरगी (लिटल स्कॉलर अकॅडमी), अक्षता इंजल (जी. जी. चिटणीस) तर इ. 10 वी मधून दिव्या एस. (भरतेश स्कूल), सुबिया उमाम (लिटल स्कॉलर अकॅडमी) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. क्विज स्पर्धेत इ. 9 वी मधून श्रेया काकडे (ज्ञान मंदिर स्कूल), रोनक पटेल (भातकांडे स्कूल), इ. 10 वी मधून अमोघवर्ष भस्मे (लिटल स्कॉलर अकॅडमी) व अमन टी. (केएलएस स्कूल) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. अंताक्षरीमध्ये अनघा कुलकर्णी (जी. जी. चिटणीस), स्नेहा शिंदे (लिटल स्कॉलर अकॅडमी) यांनी नववीमधून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. इ. 10 वी मधून अनास मुल्ला (लिटल स्कॉलर अकॅडमी), अनुषा वेर्णेकर (भातकांडे स्कूल) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले. सदर फेस्टची जनरल चॅम्पियनशीप लिटल स्कॉलर अकॅडमीने मिळविली. सदर फेस्ट यशस्वीपणे पार पडण्यासाठी संचालकांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन तर मुख्याध्यापक-शिक्षक यांनी परिश्रम घेतले.