वृत्तसंस्था /नवी दिल्ली
स्टार महिला फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज व अनुभवी अष्टपैलू शिखा पांडे यांना न्यूझीलंडमध्ये होणाऱया आयसीसी वनडे महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
मिताली राज या संघाचे नेतृत्व करणार असून हरमनप्रीत कौरकडे उपकर्णधारपद असेल. या संघात अनुभवी स्मृती मानधना व झुलन गोस्वामी तसेच युवा फलंदाज शफाली वर्मा यांचाही समावेश आहे. जेमिमा व अष्टपैलू शिखा पांडे यांच्याकडे मात्र या स्पर्धेसाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे.
महिला विश्वचषक व न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी निवडलेला संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकुर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव. राखीव खेळाडू : एस. मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादुर.
एकमेव टी-20 साठी संघ : हरमनप्रीत (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकुर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता बिश्त, एस. मेघना, सिमरन दिल बहादुर.