मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची घोषणा: पिंक फोर्सचे थाटात उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
महिला व मुलांच्या सुरक्षतेसाठी सरकार कटीबध्द आहे. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. महिला व मुलांच्या सोबत कोणतेही गुन्हेगारी प्रकार घडूनेय यासाठी राज्यात पोलीस खात्याच्या अंतर्गत पिंक फोर्स विभाग सुरु करण्यात आला आहे. पिंक फोर्स केवळ घडलेल्या गुह्यांची तपासणीच करणारच त्याच बरोबर महिला आणि मुलांसोबत कोणतेही गुन्हे घडूनये यासाठी आठवडाभर 24 तास कार्यरत असणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
काल शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंक फोर्सचे थाटात उद्घाटन करण्यात आले. मिरामार येथे झालेल्या पिंक फोर्स उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव परीमल राय, महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संचालीका दिपाली नाईक, पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला, पुजा बेदी, अमिता नायक सलत्री, हेमा सरदेसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोव्यात पर्यटक मोठय़ाप्रमाणात येत असल्याने किनारी भागात महिला तसेच मुलांसोबत गुन्हेगारी प्रकार घडत असतात. या गुन्हेगारी प्रकारांवर आळा घालण्यासाठी पिंक फोर्स सुरु करण्यात आला आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षतेसाठी पिंक फोर्स सारखा वेगळा विभाग स्थापन करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अवघ्या काही दिवसातच पोलीस खात्याने याबाबतचे सर्व सोपस्कर पूर्ण करून पिंक फोर्स सुरु केल्याबद्दत मुख्यमंत्र्यांनी पोलीस खात्याचे अभिनंदनही केले. सुरुवातील एकूण 11 वाहने कार्यरत असणार आहे. राज्यातील प्रमुख पोलीस स्थानकाला विशेस्तः किनारी भागातील पोलीस स्थानकांना प्रत्येकी एक वाहन देण्यात येणार आहे. कालांतराने राज्यातील सर्व पोलीस स्थानकांवर पिंक फोर्स ची सेवा असणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काकी गणवेशात असलेल्या पोलिसांना घडलेल्या गुह्याबाबत सविस्तर माहिती देण्यास महिला घाबरतात. पिंक गणवेशात महिला पोलीसांसोबत कोणतीही महिला आपले दुखः सहज व्यक्त करतील म्हणूनच म्हणूनच महिला आणि बालकांसाठी पिंक फोर्स खऱया अर्थाने उपयोगी पडेल असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले. गोव्याचे आणि गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नरत असून त्याचाच हा एक भाग आहे असे सांगताना त्यांनी पोलीस खाते व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी हेमा सरदेसाई पुजा बेदी यांनीही समयोजीत विचार मांडले.
पोलीस खात्यातील विविध विभागात कामकरणारे पोलीस आपापल्या कामात नियमित व्यस्त असतात. अनेकवेळा एखाद्या महिलेवर अन्याय होत असतानाही पोलीस त्या पीडित महिलेपर्यंत तात्काळ पोचू शकत नाही. त्या महिलेला जवळपास असलेल्या पोलीस स्थानकावर यावे लागते. राज्यात महिलांवरील होणाऱया अत्याचारांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. या सगळ्या गोष्टी नजरे समोर ठेऊन गोवा पोलीस खात्याने पिंक फोर्स सुरु केला आहे.
पिंक पोर्सच्या एकूण 11 वाहनापैकी प्रत्येकी एक वाहन राज्यातील मुख्य पोलीस स्थानकात ठेवण्यात येणार आहे. ही वाहने 24 तास गस्तीवर असणार आहे. पिंक फोर्स साठी 100 किंवा 1091 किंवा 112 हे संपर्क नंबर आहेत. तसेच 775756177 या क्रमांकावर वॉटसप मेशेज पाठवता येईल. सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या प्रत्येक वाहनामध्ये एक महिला पोलीस उपनिरीक्षक किंवा महिला सहाय्यक उपनिरीक्षक तसेच एक महिला हवालदार एक महिला कॉन्स्टेबल व एक महिला होमगार्ड असणार आहे. पिंक रंगाची विशेष प्रकारची गाडी व त्यात असलेल्या महिला पोलासंचा गणवेशही पिंक रंगाचा असणार असून ते 24 तास गस्तीवर असणार आहे. एखादी महिला अडचणीत असेल किंवा तिच्यावर अत्याचार होत असेल तर त्वरीत पिंक फोर्स नंबरवर संर्पक करावा. नंतर घटनेच्या जवळपास असलेले पिंक फोर्सचे वाहन घटनास्थळी अवघ्या काही मिनिटातच दाखाल होईल असा आहे पिंक फोर्स.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक वॉल्सन निधी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नंतर काही सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण करून त्याच्या माध्यमातून पिंक फोर्स महिला आणि बालकांना कशी मदत होईल त्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पणजी महिला पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक संद्या गुप्त यांनी केले.