नगरपालिकेसमोर महिलांनी केली निदर्शने
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपरिषद अतंर्गत आरोग्य विभागात स्वच्छता कर्मचाऱयांच्या सोबत ठेकेदारी पद्धतीने जवळपास 200 महिला स्वच्छता कर्मचारी आहेत. सध्या जगामध्ये कोरोना वायरसने थैमान घातले आहे. हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अशा वेळी जीवाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत. पालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचाऱयांना सर्व सुविधा व वेळेवर पगार होतात. परंतु ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱया महिला स्वच्छता कर्मचाऱयांना कोणत्याही सुविधा मिळत नाही.
या सर्व महिलांनी सोमवारी सातारा नगरपरिषद सातारा समोर निदर्शने केली. नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेतली. यावेळी ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱया महिला स्वच्छता कर्मचाऱयांचे गेली 3 महिने थकीत असलेले पगार त्वरीत मिळावेत. स्वच्छता कर्मचाऱयांचे पीएफ कपात करावी व त्यांची पावती मिळावी. ठेका पद्धतीने काम करणाऱया महिलांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा करावेत अथवा चेकने पगार द्यावा. कायम कर्मचाऱयांप्रमाणे साडी, बूट, रेनकोट मिळावेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 50 लाखाचा विमा उतरविण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या. याच वेळी नगराध्यक्षांनी 3 दिवसांत स्वच्छता कर्मचाऱयांचे पगार देण्याचे आदेश लेखापाल हिम्मत पाटील यांना दिले. यावेळी सुरेखा राज बडेकर, सावित्रीबाई वाघमारे, रेखा भोसले, सुगंधा गाडे, रत्ना सोनावले, हिराबाई पवार, अलका चव्हाण, सुमन गायकवाड, विद्या अडागळे, हिराबाई पवार, जयश्री दाबाडे, संगीता चव्हाण, जयश्री सावंत, पल्लवी खरात, संगीता चव्हाण, लक्ष्मी घाडगे व इतर स्वच्छता कर्मचारी उपस्थित होत्या.