मानसिक नैराश्येतून संपविले जीवन : बेडकिहाळ येथील घटना
वार्ताहर/बेडकिहाळ
मानसिक नैराश्येतून महिलेने येथील दूधगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार ता. 28 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान उघडकीस आली आहे. वनिता पंकज सावंत (वय 30 रा. अर्थोना, जिल्हा. बासवाडा, राजस्थान) असे या मृत महिलेचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालीले अधिक माहिती अशी की, वनिता हिचे माहेर शमनेवाडी असून गेल्या 13 वर्षापूर्वी तिचा विवाह राजस्थान येथील पंकज सावंत याच्याशी झाला होता. वनिता हिला 12 वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची जुळी मुले असून. ती गेल्या अडीच महिन्यापूर्वी राजस्थानहून माहेरी आली होती. तिला मानसिक त्रास असल्याने तिच्यावर माहेरीच औषध उपचार करण्यात येत होते. सोमवारीही तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी सकाळी 8.30 घरात भांडून हातात बॅग घेऊन ती बाहेर पडली असल्याचे काही ग्रामस्थ व घरची मंडळी सांगत होते. चांद शिरदवाडच्या बाजूला सकाळी 10. 30 दरम्यान तिचा मृतदेह तरंगत असल्याचे येथील शेतकऱयांना आढळून आले.
घटनास्थळी सदलगा पोलीस ठाण्याचे एएसआय एस. एस. पाटील, सहदेव गोडसे, एस. बी. असोदे आदींनी भेट देऊन पंचनामा करून पाहणी केली. पंचानाम्यावेळी शमनेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष शीतल पट्टणकुडे, सदस्य दीपक खोत, भरत खोत, कल्लाप्पा पुजारी, तलाठी एस. एन. नेमन्नावर, नातेवाईक उपस्थित होते.