खानापूर लैला शुगर्स रोडवरील घटनेने खळबळ
वार्ताहर /खानापूर
दुपारी साडेतीनची वेळ, दोन महिला घरच्या आपल्या ओसरीवर भाजीपाला निवडत बसल्या असताना अचानकपणे मोटारसायकलवरून दोन भामटे दारात आले. आणि आपल्या एका मित्राचा अपघात झाला आहे, आम्हाला पाणी द्या, असे सांगून त्या महिलांची दिशाभूल केली. तेवढय़ात एक महिला घरात जाऊन पाणी आणून देते. पण त्या महिलेला चकवा देत जखम झाली आहे, थोडी हळद तेल द्या, असे सांगून तेथे उपस्थित दुसऱया महिलेलाही घरात पाठवून दिले. दरम्यान, पाणी आणून देणाऱया पहिल्या महिलेच्या गळय़ातील साडेचार तोळय़ाचा सोन्याचा ऐवज हिसकावून चोरटय़ांनी पोबारा केला. ही घटना शुक्रवारी खानापूर तालुक्मयातील लैला शुगर कारखाना रस्त्यावर घडली.
लागलीच घरातील काहीनी त्या भामटय़ांचा पाठलाग केला. पण चोरटय़ांनी दुचाकीवरून पोबारा केला. सदर घटना खानापूर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुरेश सिंगे यांनी रात्री उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा केला. परंतु सुगावा काही लागला नाही.
खानापूर-पारिश्वाड रस्त्यावरील बलोगा क्रॉसपासून लैला शुगर कारखाना रस्त्यावरील एका घरात ही घटना घडली. या घटनेत मिलन दशरथ अल्लोळकर यांच्या गळय़ातील साडेतीन तोळय़ाचे गंठण व एक तोळय़ाचा आणखी एक दागिना असे एकूण साडेचार तोळय़ाचे दागिने हिसकावून चोरटय़ांनीं पोबारा केला आहे.
मिलन अल्लोळकर व बाजूच्या घरातील एक महिला या दोघी दुपारी भाजीपाला निवडत घराच्या कट्टय़ावर बोलत बसल्या होत्या. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून अचानकपणे ते दोन भामटे दारात आले. त्यांनी आपल्या मित्राचा अपघात झाल्याचे भासवून सदर महिलांना हा गंडा घातला. दरम्यान घरात असलेल्या काहींनी चोरटय़ांचा पाठलाग केला. परंतु त्या दोघांनी आपली स्प्लेंडर दुचाकी घेऊन पोबारा केला.
विशेष म्हणजे चोरटय़ांनी त्या दुचाकीवर कोणताही नंबर लावला नसल्याने ओळख पटवणे अथवा नंबर घेणे त्यांना कळले नाही. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी घटनास्थळी येऊन खानापूर रस्त्यावर असलेल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱयात तपासणी करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरळ वस्तीच्या ठिकाणी आजूबाजूला घरे नसल्याचे पाहून चोरटय़ांनी डाव साधला.