अमेरिकेतील एका महिलेने असे काम केले, जे ऐकून तुम्हीही म्हणाल असेही घडू लागलयं तर. या महिलेने स्वतःसोबतच विवाह केला आहे. एवढेच नाही तर महिलेने स्वतःच्या स्वतःसोबतच्या विवाहसोहळय़ासाठी 1 हजार युरो (1.02 लाख रुपये) खर्च केले आहेत. महिलेचे नाव मेग असून ती अमेरिकेच्या अटलांटा येथे राहते. यापूर्वी ती प्रियकरासोबत हॅलोवीन 2020 मध्ये विवाह करणार होती.
अंगठीही घातली अन् केक कापला
मेगने स्वतःच्या या विवाहात अंगठीही घातली आणि केकही कापला आहे. 35 वर्षीय मेगने स्वतःचा विवाह स्वतःसोबतच केला आहे. तिने या सोहळय़ाकरता मित्रपरिवार तसेच कुटुंबीयांना आमंत्रित केले होते. तिने स्वतःसमोर आरसा ठेवून त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि स्वतःलाच अंगठी घातली तसेच स्वतःलाच किस केले आहे.
काय म्हणते ती?
स्वतःसोबत विवाह करणे म्हणजे लोकांपेक्षा खूप पुढे जाणे आणि त्यांना गोष्टींना वेगळय़ा दृष्टीकोनातून बघण्याची गरज असल्याचे सांगणे असल्याचे मेग हिने म्हटले आहे.