शीव-आष्टी मार्गावर घरकामासाठी जातानाची घटना
प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील शीव-महाडिक वाडीतील एका महिलेस दोन अज्ञात इसमानी मारहाण करत तिच्याकडील दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल़ी म†िहलेस बेदम मारहाण करत नजीकच्या झुडपात फुकून दिल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल़ी या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत़ी या घटनेनंतर महिलेच्या मारेकऱयाच्या शोधार्थ तातडीने पोलिसांनी नाकाबंदी केली.
यशोदा शांताराम महाडिक (ऱा शीव-महा†िडकवाडी) असे महिलेचे नाव आह़े ही महिला घरकामासाठी शीव मोहल्ला येथे नेहमीप्रमाणे शीव-आष्टी मार्गाने जात होत़ी बुधवारी दुपारच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आले व त्यांनी बेदम मारहाण केल़ी अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेली महिला बेशुद्ध पडल़ी यानंतर महिलेस या दोघांनी नजीकच्या झुडपात फेकून दिल़े तिच्याकडील दागिने, काही रक्कम व मोबाईल हिसकावून पोबारा केल़ा या मार्गाने जाणाऱया काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलीस पाटील यांना कळवण्यात आल़े
पोलीस पाटील यांनी या बाबत पोलीस स्थानकात कळवल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचल़ी बेशुद्ध अवस्थेतील म†िहलेस तातडीने कळंबणी उपरूग्णालयात दाखल करण्यात आल़े रात्रीच्या सुमारास श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाल़े या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत़ी यामुळे या बाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाह़ी