प्रतिनिधी /बेळगाव
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या न्युरोसर्जनच्या पथकाने एका महिलेवरील ब्रेनटय़ुमरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली व त्या महिलेला दिलासा दिला. 25 वषीय महिला असह्य डोकेदुखी व उलटी याने त्रस्त होती. तीने डॉक्टरांना दाखविल्यावेळी तपासणीअंती खोलवर रुतलेल्या ब्रेनटय़ुमरमुळे तीला त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले.
हा टय़ुमर मेंदूच्या मध्यभागी असल्याने मेंदूला धक्का न लावता शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांच्यासमोर आव्हान होते. परंतु डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू केलेल्या ‘न्युरो एन्डोस्कोपी सिस्टम’व्दारे शस्त्रक्रिया एकाच की होलव्दारे पार पाडली. मेंदूच्या खोल गंभीर भागामध्ये इजा झाल्यास न्युरो एन्डोस्कोप वापरणे उपयुक्त ठरते. कारण त्यामुळे मेंदूला अत्यंत कमी प्रमाणात धक्का बसू शकतो, असे न्युरो सर्जनिक टीमचे डॉ. अभिषेक पाटील, डॉ. विक्रम टी. पी., डॉ. प्रकाश राठोड व न्युरो भुलतज्ञ डॉ. टीना देसाई यांनी सांगितले.
हॉस्पिटलच्या न्युरोनेवीगेशन व मायक्रोस्कोप सारख्या सुविधांबरोबर न्युरो एन्डोस्कोपी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्याचा रुग्णांना उपयोग होत असल्याचे स्पष्ट करुन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली व केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी डॉ. अभिनंदन केले आहे.