ओटवणे /प्रतिनिधी-
वाफोली गावचे सुपुत्र तथा भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी महेंद्र बळीराम गवस यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विलवडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांना पीपीई किट, हॅण्ड, स्यानिटाईझर, डिस्पो कॅप, फेस शिल्ड, कॉटन उल आदी आवश्यक वैद्यकीय साहित्य दिले.
यावेळी भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष विनेश गवस, डॉ.संजय सावळ, तळकट वैद्यकिय अधिकारी डॉ तुषार चिपळूणकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ तुषार चिपळूणकर यानी महेंद्र गवस यांचे आभार मानले.