ऑनलाईन टीम / मुंबई :
‘नाय वरन-भात लोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दुश्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तपासात पुर्णपणे सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याने न्यायालयाने त्यांच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
चित्रपटात मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखविल्यामुळे मांजरेकरांसह चित्रपटाच्या निर्मात्यावर माहिम पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा रद्द व्हावा, यासाठी महेश मांजरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने मांजरेकरांना या पूर्वीच्या सुनावणीमध्ये दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर माजरेकरांनी तापसात पुर्णपणे सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याने न्यायालयाने आज हा निर्णय बदलून मांजरेकरांना अटकेपासून दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.