कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील महे गावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा 24 या कायद्याअंतर्गत महादेव चंद्रकांत पाटील वय 25 यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. महे गावातील चंद्रकांत पाटील वय 70 (सुभेदार) रिटायर आर्मी ऑफिसर हे नोकरीला होते. त्यांना दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी दुकानगाळे काढून सर्वसामान्य जीवन व्यथित करत आहेत. त्यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा पायाने अपंग असून तो ट्रॅक्टर वर क्लिनर म्हणून काम करत आहे. तर लहान मुलगा आरोपी महादेव पाटील सुशिक्षित बेरोजगार होता. गेली दहा वर्षे तो आई वडिलांना खूप त्रास देत होता. यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो वारंवार सारखा त्रास देत होता. शेवटी त्रासास कंटाळून त्याच्या वडिलांनी त्याच्यावरती कलम 24/324,323,504,506 इत्यादी कलमाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्याच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर आरोपीस आज कोर्टासमोर हजर करून रात्री सब जेलला पाठवण्यात आले. सदर गुन्ह्याची ची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील साहेब व पोलीस हवालदार बांगर साहेब करत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार्या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झालेला असतानाच त्याच दिवशी शिवीगाळ करणे या गुन्ह्याखाली कलम क्रमांक 324 ,323, 524 व 188 अंतर्गत संदीप राज पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याची एकाच दिवशी दुसरी घटना महे गावातील या दोन्ही गुन्ह्यांची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली आहे.