मालवण/प्रतिनिधी :-
महोदय पर्वणीनिमित्त मंगळवारी दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडी देवस्थान समुद्रकिनारी मंगळवारी सकाळी समुद्रस्नानासाठी भाविकांचा जनसागर लोटला. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे या भागाला भव्य तिर्थक्षेत्राचे स्वरुप प्राप्त झाले होते. मालवण येथील श्री देव रामेश्वर, साळेल नांगरभाट श्री देव गिरोबा, कसाल पावणाई रवळनाथ, भडगाव- कुडाळ खुर्द श्री देव रवळनाथ, सोनवडे श्री देव लिंगेश्वर आणि आर्यादुर्गा, अणाव श्री देव रामेश्वर, आंबडोस रवळनाथ विठ्ठलादेवी आदी ग्रामदेवतांसमवेत हजारोच्या संख्येने भाविक समुद्रस्नानासाठी दांडी समुद्रकिनारी आले होते.