वृत्तसंस्था / माँटेरी (मेक्सिको)
डब्ल्युटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या माँटेरी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या लैला फर्नांडिझने एकेरीचे जेतेपद मिळविताना कोलंबियाच्या कॅमिला ओसोरीओचा पराभव केला.
रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात विद्यमान विजेत्या फर्नांडिझने ओसोरीओचा 6-7 (5-7), 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करत अजिंक्यपद मिळविले. हा अंतिम सामना तीन तास चालला होता. या जेतेपदामुळे फर्नांडिझने या स्पर्धेतील अजिंक्यपद पुन्हा स्वतःकडे राखले. या लढतीतील दोन सेट्स टायब्रेकरपर्यंत लांबले होते.