वृत्तसंस्था/ माँटेकार्लो
एटीपी टूरवरील पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया एटीपी मास्टर्स माँटे कार्लो आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिएमला कोरोनाची बाधा झाल्याने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. इटलीच्या मॅटेव बेरेटिनीवर किरकोळ स्वरुपाची शस्त्रक्रिया होणार असल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रियाच्या 28 वर्षीय थिएमने प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दोनवेळा उपविजेतेपद तर 2020 साली त्याने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. अलीकडेच मार्बेला येथे झालेल्या एटीपी चॅलेंजर टूरवरील स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर थिएमला कोरोनाची बाधा झाली. माँटे कार्लो स्पर्धा 11 ते 17 एप्रिल दरम्यान खेळविली जाणार आहे. इटलीचा टेनिसपटू बेरेटिनी याच्यावर किरकोळ स्वरुपाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्याला काही दिवस विश्रांती जरुरीची असल्याने तो माँटे कार्लो स्पर्धेत खेळू शकणार नाही.