वृत्तसंस्था/ माँट्रियल
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या माँट्रियल खुल्या हार्डकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या कॅमिला जॉर्जीने एकेरीचे जेतेपद मिळविताना झेकच्या सहाव्या मानांकित प्लिसकोव्हाला पराभूत केले.
डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील जॉर्जीचे हे सर्वात मोठे विजेतेपद आहे. रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मानांकनात 71 व्या क्रमांकावरील जॉर्जीने चौथ्या मानांकित प्लिसकोव्हाचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत पहिल्यांदाच इटलीच्या स्पर्धकांनी जेतेपद मिळविले आहे.