वार्ताहर/ कारदगा
मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या शाळा खोल्यांचा लोकार्पणाचा सोहळा भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला. मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने मराठी सरकारी मुलांची शाळा 2 खोल्यांसाठी 22 लाख व मराठी सरकारी मुलींची शाळा तीन खोल्यासाठी 33 लाख रुपये मंजूर करून काम पूर्ण झाले आहे. या पूर्णत्वास आलेल्या खोल्यांचा लोकार्पण सोहळा मंत्री शशिकला जोल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मंजूर झालेल्या 15 लाख रुपयांच्या मंजुरी पत्राचे वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.