वार्ताहर / दोडामार्ग:
गोव्यातील मोरजी येथे झालेल्या दुचाकी अपघातात दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथील विनोद ब्रह्मदेव गवस या 33 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
गोव्यात कामानिमित्त असलेला सदर युवक आपल्या दुचाकीवरून प्रवास करताना त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला धडकली. यात विनोदला बराच मार लागला. अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. रविवारी दुपारी विनोदचा मृतदेह मांगेली फणसवाडी येथील घरी आणण्यात आला. त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोदच्या निधनाने मांगेली गावावर शोककळा पसरली आहे.