सरवडे / प्रतिनिधी
आकनूर रोडवर मांगेवाडी ता.राधानगरी या गावानजीक चालत्या उसाच्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन खाली पडल्याने मोघर्डे ता.राधानगरी येथील चालक जितेंद्र भीमराव कांबळे( वय३०) याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कसबा तारळे येथील शिवाजी लक्ष्मण जाधव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर एम.एच.०९ एफ.जे.२२४० हा रिलायबल शुगर फराळे कारखान्यास ऊस वाहतूक करत असताना मांगेवाडी गावानजीक चालत्या ट्रॅक्टरमधून तोल गेल्याने चालक जितेंद्र कांबळे याचा मागील ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला कांबळे हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, भाऊ व भावजय असा परिवार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे करण्यात आले. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे बजरंग पाटील, प्रमोद पाटील करत आहेत.