प्रवास आवडणारी एक मांजर सध्या चर्चेत आहे. ही भटकंती करणारी मांजर त्याच्या घरमालकासोबत बाइड राइडवर जाते, सायकलवरूनही प्रवास करते. या मांजराचे नाव कॅथोड असून त्याच्या घरमालकाचे नाव रॅमी आहे. कॅथोडला रोमांच अत्यंत आवडतो.
6 वर्षांपूर्वी रॅमीने ऍनिमल शेल्टरमध्ये जात कॅथोडला घरी आणले होते. काही दिवसांपर्यंत कॅथोड झोपून राहायची, अन्य मांजरांप्रमाणे आराम करणे तिला आवडायचे. पण या मांजराला केवळ अपार्टमेंटचे जीवन दिल्याचे शल्य रॅमी यांना वाटू लागले. अशा स्थितीत रॅमी मांजराला बाहेर घेऊन जाऊ लागले. दोघेही आउटिंगसाठी जात होते. काही काळानंतर या मांजराला बाहेर पडणे अधिक आवडत असल्याचे रॅमी यांच्या लक्षात आले.
बाइकवर फिरू लागली
रॅमीला स्वतःच्या बाइकवर लाँग राइड्स आवडते, तो मांजरालाही स्वतःसोबत घेऊन जाऊ लागला. तिच्यासाठी त्याने एक हेल्मेटही तयार केले. सायकलवर मागे एक बॅग अडकवून मांजराला सोबत नेण्याचा प्रकार सुरू झाला. रॅमीसोबत मांजर पॅराग्लायडिंग आणि स्कीइंगही करू लागले आहे. रोमांचक अनुभव देण्यासाठी रॅमी मांजराला नव्या नव्या ठिकाणी घेऊन जातो. बाइक आणि सायकल राइडसाठी मांजराकरता रॅमीने वेगळय़ा प्रकारचा चष्माही तयार करवून घेतला आहे.
हजारो फॉलोअर
इन्स्टाग्रामवर या मांजराला 75 हजार जण फॉलो करतात. रॅमी स्वतःच्या पाळीव मांजराला अपार्टमेंटचे जीवन जगू देऊ इच्छित नव्हते.