प्रतिनिधी/ बेळगाव
मांजामुळे अनेक वेळा लहान-मोठे अपघात घडत आहेत. विद्युत तारांमध्ये मांजा अडकून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे मांजा विकणाऱयांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. माळमारुती पोलिसांनी मांजा विक्री करणाऱया दुकानांवर धाड टाकून मांजा जप्त केला आहे. यामुळे विपेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मांजामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. काही जण गंभीर जखमी झाले आहेत. पतंग उडविण्यासाठी मुले मांजाचा वापर करतात. पतंग उडविताना दुचाकीस्वार किंवा ये-जा करणारे या मांजामुळे जखमी होत आहेत. या मांजामुळे अनेकांचा गळादेखील चिरला आहे. अशा गंभीर घटना घडत असल्यामुळे आता मांजावर बंदी घालण्यात आली असून विक्री करणाऱयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.