सातारा / प्रतिनिधी :
पर्यावरणाची हानी होत असल्याने नॉयलॉनचा मांजा विक्री करण्यास न्यायालयाने बंदी आणली आहे. तरीही न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून मांजा विक्री करणाऱ्या फलटण येथील मोहम्मद सलीम शेख (रा. मेटकरी गल्ली फलटण) याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहम्मद सलीम शेख हा नॉयलानचा मांजा दि. 30 रोजी रात्री 8.42 वाजण्याच्या सुमारास विक्री करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश दडस यांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार फरांदे हे तपास करत आहेत.